Tags

, , , ,

Here is an introduction in Marathi to my blog http://ayurgarden.wordpress.com

पूर्वीच्या काळापासुन मानव वनस्पतींचे जतन करत आला आहे. आयुर्वेदात तर वनस्पतींचे महात्म्य वर्णनं केलेले आहेच. प्रत्येक वनस्पती मध्ये काही ना काही औषधी गुण आढळतोच. खरच आपले आणि इतर प्राण्यांचे जीवन व्याधीमुक्त होऊन आनंदी करण्याकरता आपण अशा हजारो वनस्पतींचा वापर करत आलो आहोत. आज जरी अनेक वनस्पती तोडू नका, जगवा, वाढवा असा गजर करावा लागत असला, तरी भारतीय परंपरेत वृक्षांचे पालनपोषण हा नित्य जीवनाचा अविभाज्य घटक सांगितलेला आहे. गावागावांतून राखली गेलेली अभयारण्ये, देवासाठी राखलेल्या देवराया हे सारी याचीच उदाहरणे आहेत.

आजच्या राहणीमानात जरी वनस्पतींचे जतन करण्यासाठी खास असे प्रयत्न सगळेच करू शकत नसले तरी वेगवेगळ्या प्रथांनुसार भारतात आणि भारताबाहेरही वनस्पती जतन करण्यासाठी काही वेगवेगळे वेगवेगळे प्रयत्न होताना जाणवत असतात.

तसे पहिले तर आजही आपले स्वयंपाकघर मिरी, पिंपळी, लवंग, दालचीनी, बडीशेप, हळद, वेलची, हिंग, वावडिंग, ओवा, आले, हिरडा, खोबरे, मुरूड्शेंग, वेखंड, जेष्ठमध, जायफळ, बदाम, सुंठ, हळीव, ,धने, जिरे, लसूण, कांदे, अनेक प्रकारचा फळभाज्या, फळे, तुळस बी, चारोळी, मका, जास्वंद, दूर्वा, शिकेकाई, रिठा, तीळ, कडूलिंब, कढीलिंब, तमालपत्र, जायपत्रि, विड्याची पाने, हयातलया किमान 25 पदार्थांनी तरी सजवलेले असतेच. ह्या सार्‍या वनस्पतीजन्य गोष्टी रोजच्या आहारात आपण घेतल्या तर आपला फायदा होतो हे ही आपण जाणून असतो.

शहरांमध्ये आजकाल पाहिले तर interior and exterior चा एक भाग म्हणून का असेना झाडांची जोपासना केली जाते. काही जण अगदी स्वतः नर्सेरीत जाऊन, झाडे आणून माळी काकांची मदत घेऊन मशागत करून कुंड्या झाडे अतिशय नीट जोपासतात. फक्त आपलयातल्या बर्‍याच जणांना हे माहीत नसत की बागेत काय सहज लावता येईल? कोणती छोटी झाडे लावता येतील कुठल्या झाडाचे काय फायदे? त्यातले काय आपण घरचा घरी वापरू शकू ?

कुठले औषधी आणि कुठले सुंदर दिसू शकेल? कुठले झाड आपले (Native) आणि कुठले परकीय (Nonnative)? हे सारे समजून घेत असतांनाच, आपला संवर्धनाला सहजतेने हातभार कसा लागेल हे सांगण्यासासाठीचा खरे तर हा ब्लॉग प्रपंच आहे.

Ayurgarden मध्ये उपयुक्त आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या बागेतील लागवड आणि उपयोगांवर सर्व काही असेल.

Advertisements